महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने जीवन विमा महामंडळाने (LIC) विमा सखी योजना सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 डिसेंबर 2024 रोजी पानिपत येथे या योजनेच्या शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे या योजनेला महिलांकडून चांगला प्रसिसाद मिळाला असून एका महिन्याचे कालावधीतच 52,511 महिलांनी अर्ज केला आहे.
विमा सखी योजना म्हणजे काय?
विमा सखी योजनेचे मुख्य उद्देश महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 3 वर्षांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते, आणि त्यांना (LIC) एजंट म्हणून तयार केले जाते. प्रशिक्षणा दरम्यान महिलांना मानधन स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते.
- पहिल्या वर्षी : दरमहा ₹७,०००
- दुसऱ्या वर्षी : दरमहा ₹६,०००
- तिसऱ्या वर्षी : दरमहा ₹५,०००
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी LIC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करावा.
- अर्जासाठी पात्रता.
वय: 18 ते 70 वर्ष
किमान शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण
विमा सखी योजना ही महिलांसाठी आर्थिक स्थिरता आणि रोजगारांच्या संधी निर्माण करणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे. महिलांनी ही संधी साधून स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकावे.
👉🏻 अधिक माहिती जाणून घेण्याकरीता महिलांनी LIC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.